मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

महाराष्ट्रात किती पाऊस पडणार २०२३ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र, दक्षिणेकडे पाऊस कमी होणार

 विदर्भ ते उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र असून, हे क्षेत्र मराठवाडा, कर्नाटकच्या भागावरून जात आहे. तसेच अरबी समुद्राकडून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने याच्या प्रभावामुळे कोकण-गोवा, दक्षिण महाराष्ट्र, बेळगावसह अनेक भागांत मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या क्षेत्राचा परिणाम आणखी दोन दिवस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान याच्या प्रभावामुळे कोकण-गोव्यात पुढील चार दिवस, तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यातही पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. वरील सर्व क्षेत्रांच्या प्रभावामुळे देशभरातील काही भागांत नोंदविण्यात आलेली उष्णतेची लाट तसेच कमाल तापमानात घट होणार असून, वायव्य, मध्य, पश्चिम व पूर्व भारतातील कमाल तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी दिल्ली, उत्तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंडच्या काही भागात उष्णतेची लाट नोंदविण्यात आली. कर्नाटकात ‘यलो अलर्ट’ कर्नाटकात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटक तसेच कर्नाटक कि...