मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्र, दक्षिणेकडे पाऊस कमी होणार

 विदर्भ ते उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र असून, हे क्षेत्र मराठवाडा, कर्नाटकच्या भागावरून जात आहे. तसेच अरबी समुद्राकडून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने याच्या प्रभावामुळे कोकण-गोवा, दक्षिण महाराष्ट्र, बेळगावसह अनेक भागांत मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या क्षेत्राचा परिणाम आणखी दोन दिवस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान याच्या प्रभावामुळे कोकण-गोव्यात पुढील चार दिवस, तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यातही पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

वरील सर्व क्षेत्रांच्या प्रभावामुळे देशभरातील काही भागांत नोंदविण्यात आलेली उष्णतेची लाट तसेच कमाल तापमानात घट होणार असून, वायव्य, मध्य, पश्चिम व पूर्व भारतातील कमाल तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी दिल्ली, उत्तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंडच्या काही भागात उष्णतेची लाट नोंदविण्यात आली.

कर्नाटकात ‘यलो अलर्ट’

कर्नाटकात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटक तसेच कर्नाटक किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे.मान्सूनसाठी पोषक स्थिती

मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला असून, पुढील दोन दिवसांत तो दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार बेटे व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pm kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या दुपारी १२ वाजता पी एम किसान चा 14 वा हप्ता जमा होणार लगेच यादीत नाव पहा.!

Pm kisan: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतेज्याद्वारे शेतकरी व शेतीसाठी त्यांना मदत मिळावी व शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा अशी त्या मागचा हेतू असतो. तर केंद्र सरकारच्या अशाच पीएम किसान व नमो शेतकरी योजना या दोन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत असते. ज्या शेतकऱ्यांना तेरा हप्ता मिळाला नाही त्यांनी इथे करा तक्रार.. परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या दोन्ही योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे. यासाठी त्यांनी कोठे अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रे लागते, तसेच कोणती शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात यासहित विविध प्रकारची माहिती आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोतअसे दोन्ही हप्त्याचे दोन दोन हजार रुपये चार हजार रुपये तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला का महिन्यात मिळणार आहेत   असे सर्व रक्कम मिळून तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत.two   यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा     तरी ज्या शेतकऱ्यांनी आत...