मुख्य सामग्रीवर वगळा

Maharashtra Rains: राज्यात पुढील ५ दिवस धुवाँधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

monsoon update 2023: राज्यात येत्या पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा महत्त्वपूर्ण इशारा
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून तुरळक अपवाद वगळता मुंबईसह राज्यात दमदार पाऊस पडत आहे. यंदा राज्यात मान्सून तब्बल १५ दिवस उशीराने दाखल झाला. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने ही कसर भरून निघाली आहे. परंतु, राज्यात अद्याप शेतांमध्ये पेरणी करण्याइतका पाऊस झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या होसाळीकर यांनी राज्यात येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली आहे. होसाळीकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असून २ जुलै पासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागांत व संलग्न भागावर होण्याची शक्यता. राज्यातही ४ आणि ५ या दिवशी त्याचा प्रभाव राहील, अस होसाळीकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे जुलै महिन्याचे पहिले पाच दिवस मुसळधार पावसाचे असण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगराच्या परिसरात शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र आहे. पावसाची रिपरिप सुरु असून अधुनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत व तीव्र सरी आताही चालू आहे. सुरक्षितपणे प्रवास करा व सखल भागात पाणी साचल्यास काळजी घ्या. माहीत असलेल्या भागातूनच चालत जा, असेही होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी दमदार पाऊस कोसळेल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


महाबळेश्वरला जोरदार पाऊस

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजाला पाच दिवसांपासून पाऊस सुरू असून, महाबळेश्वरला २४ तासांत ११८ मिलीमीटरची पर्जन्यमानाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. पश्चिम भागातील कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात सतत पाऊस पडत आहे. यामुळे ओढे, नाले, भात खाचरे भरून पाणी वाहत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Pm kisan : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्या दुपारी १२ वाजता पी एम किसान चा 14 वा हप्ता जमा होणार लगेच यादीत नाव पहा.!

Pm kisan: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतेज्याद्वारे शेतकरी व शेतीसाठी त्यांना मदत मिळावी व शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा अशी त्या मागचा हेतू असतो. तर केंद्र सरकारच्या अशाच पीएम किसान व नमो शेतकरी योजना या दोन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत असते. ज्या शेतकऱ्यांना तेरा हप्ता मिळाला नाही त्यांनी इथे करा तक्रार.. परंतु ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या दोन्ही योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांनी काय करावे. यासाठी त्यांनी कोठे अर्ज करायचा अर्ज करण्यासाठी कोणत्या कागदपत्रे लागते, तसेच कोणती शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात यासहित विविध प्रकारची माहिती आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोतअसे दोन्ही हप्त्याचे दोन दोन हजार रुपये चार हजार रुपये तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला का महिन्यात मिळणार आहेत   असे सर्व रक्कम मिळून तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहेत.two   यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा     तरी ज्या शेतकऱ्यांनी आत...