एकीकडे शेती शेती मालाला मिळत नसलेला भाव त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात नेहमीच अश्रू पहायला मिळतात. कष्ट पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात नेहमीच समस्यांचे बांध असतात. मात्र, हे सर्व करत असताना शेतकऱ्याचं पोरगं मात्र मोठी मोठी स्वप्न पाहतं. स्पर्धा परिक्षा, कलेक्टर, ऑफिसर, सरकारी नोकरी. अशाच एका शेतकऱ्याच्या मुलानं सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलं. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शेतात काम करत असताना शेतकर्याच्या मुलाला सरकारी नोकरी रिझल्ट लागतो, आणि त्यावेळी वडिलांना होणारा आनंद हा शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. बाप-लेकाचा हा व्हिडओ पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दुपारच्या भर उन्हात बाप-लेक शेतात काम करत आहेत. यावेळी अचानक शेतकऱ्याच्या मुलाला कळतं की त्याचा सरकारी नोकरीच्या परिक्षेचा निकाल लागला आहे. त्यानंतर त्याला कळतं की, त्याला सरकारी नोकरीही लागली आहे. तेव्हा वडिलांसमोर ही बातमी एकून मुलाला आणि वडिलांना अश्रू अनावर होतात. दोघेही एकमेकांना मिठी मारुन रडू लागतात. वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मुलं अभ्यास करतात, स्वप्न पाहतात, आणि जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरतं तेव्हा आयुष्यभराचे कष्टाचं फळं मिळाल्याची भावना या व्हिडीओमध्ये शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा