- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
monsoon update 2023: राज्यात येत्या पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यातील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा महत्त्वपूर्ण इशारा मुंबई: गेल्या काही दिवसांपासून तुरळक अपवाद वगळता मुंबईसह राज्यात दमदार पाऊस पडत आहे. यंदा राज्यात मान्सून तब्बल १५ दिवस उशीराने दाखल झाला. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने ही कसर भरून निघाली आहे. परंतु, राज्यात अद्याप शेतांमध्ये पेरणी करण्याइतका पाऊस झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आता हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या होसाळीकर यांनी राज्यात येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली आहे. होसाळीकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असून २ जुलै पासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागांत व संलग्न भागावर होण्याची शक्यता. राज्यातही ४ आणि ५ या दिवशी त्याचा प्रभाव राहील, अस हो...